You are currently viewing मराठा तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यास पुढाकार – लवू वारंग

मराठा तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यास पुढाकार – लवू वारंग

माणगाव प्रतिनिधी

छत्रपती शिवराय महाराज की जय म्हणत गेली चाळीस वर्षे मराठा समाजासाठी कार्य करत असणारे लवू वारंग यांनी आज माणगाव येथील त्यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये मराठा बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने व्यापार व व्यवसाय मध्ये लागणारी जागा उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने दि. ५ सप्टेंबर २०२० सकाळी ठीक दहा वाजता याचे भूमिपूजन केले. सुरुवातीला छत्रपती शिवराय यांचे गळ्यात हार अर्पण करुन भूमीला श्रीफळ अर्पण केले .त्यावेळी  लवू वारंग म्हणाले की, सद्या बेरोजगारी मोठया प्रमाणात वाढत चालली आहे. त्यात मराठा तरुणांना नोकऱ्या पण कमी प्रमाणात मिळत असल्याने तरुण वर्ग अस्थिर होत चालला आहे. यासाठी गेली तीस वर्षे छत्रपती शिवराय यांची स्थापना करून त्यांची सेवा करत आलेलो आहे. त्यांच्याच कृपा आशीर्वादाने मराठा तरुण वर्गासाठी व्यवसाय व व्यापार करण्याच्या हेतूने जागा उपलब्ध करून देण्याचे कार्य हाती घेत आहे.काही तरुणांची इच्छा असून पण अमाफ भाडे व डिपॉजिट या कारणामुळे व्यापार करण्यापासून वंचीत राहावे लागू नये यासाठी गाळे बांधून देण्याचे कार्य हाती घेतले आहे.तसेच त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा सागर वारंग पण या मराठा सेवेस हातभार लावत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांचे बंधू बाबुराव वारंग व अंकुश वारंग यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच नितेश वारंग पण उपस्थित होते._

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × two =