You are currently viewing लोरेतील पालकमंत्री, खासदार यांनी उदघाटन केलेला मोबाईल टॉवर अनधिकृत…

लोरेतील पालकमंत्री, खासदार यांनी उदघाटन केलेला मोबाईल टॉवर अनधिकृत…

बीएसएनएल मोबाईल टॉवरची होणारी उदघाटने प्रशासकीय नाहीत; दूरध्वनी केंद्र उपमंडल अधिकाऱ्यांचा कणकवली पंचायत समिती सभेत खुलासा.

कणकवली

पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसमवेत बीएसएनएल मोबाईल टॉवरची होणारी उदघाटने दूरसंचार निगम घेत नाही. बीएसएनएलची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे कोणतेही उदघाटन सोहळे आयोजित करत नाही. लोरे येथील बीएसएनएल बंद टॉवरचे पालकमंत्री, खासदार, यांच्या उपस्थितीत झालेले उद्घाटन दूरसंचार निगम प्रशासनाने केले नाही, असे स्पष्टीकरण दूरध्वनी केंद्र उपमंडल अधिकारी वाय.जी.भागवत यांनी दिली. कणकवली पंचायत समितीच्या सभेतच हे उत्तर दिले असल्याने जिल्हयात बीएसएनएल टॉवरची होणारी उदघाटने अनधिकृत आहेत, हे स्पष्ट झाले आहे. सभापती दिव्या पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा झाली यावेळी दिलीप तळेकर, भाग्यलक्ष्मी साटम, सुजाता हळदीवे, प्रकाश पारकर, मंगेश सावंत, सौ.स्मिता मालडिकर, सुचिता दळवी यांनी चर्चेत भाग घेतला.यावेळी कणकवली पंचायत समितीच्या मासिक सभेत लोरे येथील बंद टॉवरच्या उद्घाटणाचा प्रश्न चगलाच गाजला.लोरेचा बीएसएनएल टॉवर बंद आहे, मात्र त्याचे उदघाटणाचा घाट घातला गेला.स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य यांना विश्वासात घेतलेले नाही.आजही टॉवर विजेची जोडणी नसल्याने बंद आहे.काम अपूर्ण असतांना उदघाटण करतातच कशी असा सवाल पंचयत समिती सदस्य मनोज रावराणे, मिलिंद मस्त्री यांनी उपस्थित केला. याला उत्तर देताना दूरध्वनी केंद्र उपमंडल अधिकारी वाय.जी.भागवत यांनी आपल्या कार्यालयाकडून असे कोणतेही उदघाटण झालेले नाही असे स्पष्ट केले. मग पालकमंत्री, खासदार, प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी या कार्यक्रमात सहभागी कसे होतात ? यावर गटविकास अधिकारी यांनाही धारेवर धरण्यात आले.पालकमंत्री प्रोटोकॉल असल्यामुळे आपण उपस्थित होतो असे गटविकास अधिकारी चव्हाण यांनी सांगितले. शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई कधी मिळणार ? सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असा आरोप दिलीप तळेकर यांनी केला. कणकवलीत कोविड सेंटर असतांना रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले का जातात असा सवालही यावेळी केला. या वेळी इतर विषयावर सुद्धा चर्चा झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 2 =