You are currently viewing आरवली ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

आरवली ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

सरपंच पदी तातोबा कुडव तर उपसरपंचपदी रिमा मेस्त्री विजयी

वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुक्यातील आरवली ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत चमत्कार घडला.भाजपा चे पाच सदस्य असताना सरपंच तातोबा कुडव यांना सहा मते मिळाली. तर काँग्रेस पक्षाचे उपसरपंच पदाचे उमेदवार प्रवीण मेस्त्री यांनी उमेदवारी मागे घेतल्याने उपसरपंच पदी भाजपा महिला मोर्चा च्या रीमा मेस्त्री ह्या बिनविरोध निवडून आल्या.आरवली ग्रामपंचायती मध्ये एकूण नऊ सदस्य संख्या आहे. त्यापैकी भाजपच्या पॅनल मधून पाच सदस्य निवडून आले. म्हणूनच सरपंच पदासाठी तातोबा कुडव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी शिवसेनेच्या वैशाली रेडकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र प्रत्यक्ष मतदानावेळी महाविकास आघाडी ची बिघाडी दिसून आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − eight =