You are currently viewing रुसवा

रुसवा

नको रुसू नको रागावू,
लाली गालावरची जाई..
पाही कोमेजले रूप,
मनी शिक्षा मज होई..
नको रुसू….

रुसवा तुझा एका क्षणी,
निरोप घेवोनी जाई.
आठवण जेव्हा तुज,
माझ्या प्रेमाची होई.
नको रुसू….

अंतरीचा आनंद तुझ्या
ओठी ओसंडून वाही,
तुझ्या मनीचे सुख नयनी,
मोती होऊनी जाई.
नको रुसू….

सुखी तुज पाहताची,
मनी गुलाबची फुले.
काटे टोचोनिया हृदयी,
कधी जखम ना होई,
नको रुसू …

एक एक शब्द तुझा,
घाव माझ्या मनावर घाली.
कण कण तुटूनी हृदय,
मरणा समीपची जाई.
नको रुसू नको रागावू,
लाली गालावरची जाई….

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + three =