You are currently viewing मळा विठोबाचा

मळा विठोबाचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकरमहाराज – काव्यचरितावली*

*काव्य-पुष्प -‘दुसरे – मळा विठोबाचा !!*
———— —
*मळा विठोबाचा*
————-
श्रीमहाराजांची माता-पितरें
स्मरण करूया त्यांचे आदरे
पंत आजोबा वयोमाने थकले
त्यांनी पंढरीनाथास प्रथिले ।। १ ।।

मळ्यात पंतासंगे जन जमले
खोदल्या खड्य्यात देव सापडले
सगळ्यांना सुंदर मूर्तीरूपात ते
विठोबा- रुखमाई दर्शन जाहले ।। २ ।।

शुभ मुहूर्तावरी देव स्थापन केले
अन्नदान,भजन,कीर्तन सोहोळे झाले
विहीर विठोबाची,मळा विठोबाचा
भावभक्तीचे स्थान नाव ख्यात झाले ।। ३ ।।

श्रीगुरुकृपेचा साराच हा महिमा
कवी अरुणदासा लाभे लेखनभान
लेखना मिळे प्रेरणा आपोआप
शब्दाक्षरे प्रकटती शोभायमान ।।४ ।।
क्रमशः….
——————————–
कवी अरुणदास”- अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342

 

प्रतिक्रिया व्यक्त करा