You are currently viewing ।। प्रथम पुष्प ।।

।। प्रथम पुष्प ।।

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्रीगोंदवलेकरमहाराज-काव्यचारितली-*

*।। प्रथम पुष्प ।।*
—————————————–
श्रीसद्गुरूंना नमस्कार केला । श्रीकृपेने आरंभ केला ।
काव्यचरितावली सेवाउपक्रम ।श्रीसद्गुरूचरणी रुजू केला ।।१।।
जाणोनी घ्यावे तुम्ही आता जन हो ।श्री महाराजांच्या पूर्वचरिता । पूर्वज थोर सत्पुरुष असती। संस्कार सावलीत सारे घडती ।। २ ।।
वावरहिवरे जवळ गोंदवले ।मूळ पुरुष रुद्रोपंत हो इथले ।
विठ्ठल भक्तीभाव सदा अंतरी । नियमित करी पंढरीची वारी ।। ३ ।।
श्रीमहाराजांचे आजोबा लिंगोपंत । कुलकर्णीपदाची प्रतिष्ठा
वाढविली ।कर्तव्यपरायण “लिंगोपंत इनामदार । कीर्ती
आसमंतात हो पसरली ।। ४ ।।
राधाबाई आज्जी ,लिंगोपंत आजोबा ।आदर्श वडीलधारे हे
लाभले ।सहवासात श्रीमहाराज घडले । आनंदात बालपण गेले ।।५ ।।
कवी-अरुणदास म्हणे- गोड मानुनि घ्यावे लेखन हे ।।
क्रमशः …
—————————————–
-अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
दै.आधुनिक केसरी अंक-दि.१७-११-२०२२

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + eleven =