*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गोवत्स द्वादशी*
कृषीप्रधान आहे
आपला भारत देश
पूजन उद्देश
गोमातेचे….
भारतीय संस्कृतीत
पवित्र असते गाय
आपली माय
ती…
शेतीसाठी बैल
बाळाला दूध पौष्टिक
मिळते सात्विक
गोमातेचे….
शेण गोमुत्र
खत औषधी खास
असते आरोग्यास
उपयुक्त....
गोवत्साची सेवा
नित्य घडावे वंदन
करावे रक्षण
गोवंशाचे….
गोवत्स द्वादशीस
गाय वासराचे पूजन
कृतज्ञतेने वंदन
गोमातेला…..!!
➿➿➿➿➿
अरुणा दुद्दलवार @✍️
