You are currently viewing पणदूर महाविद्यालयाचे मुंबई विद्यापीठाच्या ‘युवा महोत्सवात’ सुयश संपादन

पणदूर महाविद्यालयाचे मुंबई विद्यापीठाच्या ‘युवा महोत्सवात’ सुयश संपादन

कुडाळ (पणदूर) :

 

पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या ५५ व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवामध्ये ‘मेहंदी डिझायनिंग’ या स्पर्धेत सुयश संपादन केले आहे. वाणिज्य (बँकिंग अँड इन्शुरन्स) या शाखेतील तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु. पियुषा सुनील पावसकर यांनी ५५ व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवामध्ये ‘मेहंदी डिझायनिंग’ या स्पर्धेत भाग घेऊन द्वितीय क्रमांक मिळवला होता. त्यातून त्यांची ‘मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव’ अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. यावेळी कु. पियुषा यांनी मेहंदी डिझायनिंग या स्पर्धेत ‘दुल्हन मेहंदी’ या विषयावर मेहंदी काढून मुंबई विद्यापीठात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. पुष्कराज कोले, कार्याध्यक्ष श्री. शशिकांत अणावकर, उपाध्यक्ष श्री. प्रकाश जैतापकर, सचिव डॉ. अरुण गोडकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व तमाम विद्यार्थीवर्गाने त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले व महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याबद्दल कु. पियुषा पावसकर यांना सर्वांनी धन्यवाद दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 18 =