You are currently viewing कुडाळात उद्या ‘मराठा उद्योग डिरेक्टरी एप्सचा’ उद्घाटन समारंभ

कुडाळात उद्या ‘मराठा उद्योग डिरेक्टरी एप्सचा’ उद्घाटन समारंभ

कुडाळ :

अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग आयोजित मराठा उद्योग डिरेक्टरी एप्सचे उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक १९ मे २०२२ रोजी दुपारी २.३० वा. रवीकमल मंगल कार्यालय, मुंबई- गोवा हायवे नवीन बस डेपो, कुडाळ येथे होणार आहे. या एप्सचे उद्घाटन मा.खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी श्री राजेंद्र कोंढरे (राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ), श्री वैभव नाईक (आमदार कुडाळ मालवण मतदार संघ), श्री मनीष दळवी (अध्यक्ष जिल्हा सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक), श्री श्री श्री १०८ महंत (मठाधीश गावडे काका महाराज) यांची प्रमुख उपस्थिती आहे. तरी सर्वांनी उद्घाटन समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा