You are currently viewing सरमळेत “निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिर संपन्न”

सरमळेत “निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिर संपन्न”

सावंतवाडी

ग्रामीण – दुर्गम भागातील गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी द्वारे अशा भागात “निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिर” आयोजित केल्या जातात. याच उद्देशाने सरमळे गावातील दुर्गम अशा शितपवाडी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले. शितपवाडी सिंहगर्जना ग्रुपसह संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात रक्तगट, हिमोग्लोबिन, ब्लड शुगर सह हाडांची घनता ई. तपासण्या करण्यात आल्यात. या शिबिरात डॉ शंकर सावंत, डॉ नंदादीप चोडणकर, डॉ विशाल पाटील, डॉ सौ मीना जोशी व डॉ सौ मुग्धा ठाकरे यांनी रुग्ण तपासणी करून उपचार केले. यावेळी आवश्यक बरीचशी औषधे रुग्णास निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आली. सर्व रुग्णांना मास्क वाटप करण्यात आले. या शिबिराचा लाभ सुमारे १०० नागरिकांनी घेतला.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सौ वेलांकिनी कार्डोस, भार्गवराम शिरोडकर, दिपक गावकर, सिद्देश मणेरीकर, अँड्र्यू फर्नांडिस, आनंद मेस्त्री, संतोष नाईक या सिंधुमित्रांसह संदिप जंगले, रामू जंगले, विजय जंगले व इतर शितपवाडीवासीयांनी परिश्रम घेतले. सर्वप्रकारच्या तपासण्या, तज्ञ वैद्यकीय सल्ला, औषधोपचार, मास्क वाटप ई. निःशुल्क परंतु दर्जेदार सेवाभावी उपक्रमाबाबत शितपवाडीतील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 4 =