You are currently viewing वेंगुर्ले-उभादांडा येथील मानसींश्वर देवाचा २० फेब्रुवारीला वार्षिक जत्रोत्सव…

वेंगुर्ले-उभादांडा येथील मानसींश्वर देवाचा २० फेब्रुवारीला वार्षिक जत्रोत्सव…

यंदा जत्रोत्सव गाव मर्यादित; भाविकांनी नियमांचे पालन करावे-ग्रामस्थांचे आवाहन…

वेंगुर्ले
वेंगुर्ले-उभादांडा येथील प्रसिद्ध श्री मानसींश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव यावर्षी २० फेब्रुवारी रोजी कोरोनाच्या महामारी मुळे सर्व नियमांचे पालन करून गाव मर्यादित साजरा करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या देवाचं वार्षिक जत्रोत्सव दरवर्षी माग शुक्ल पक्ष अष्टमीला असतो. या जत्रोत्सवाला शीडाची जत्रा व बत्तीची जत्रा या नावानेही ओळखले जाते. जत्रा उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे दिवाबत्ती च्या उजेडात रात्री दशावतारी नाटक सादर होते. दरवर्षी वार्षिक जत्रोत्सवाला हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात. मात्र यावर्षी कोरोना चे संकट असल्यामुळे ग्रामस्थांनी एकत्रितरीत्या शासनाचे नियम पाळून हा जत्रोत्सव गाव मर्यादित साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी भाविकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी देवाच्या चरणी श्रीफळ अर्पण करून हा जत्रोत्सव निर्विघ्नपणे पणे पार पडावा अशी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =