You are currently viewing संवाद मीडियाच्या बातमीनंतर वाफोली जत्रोत्सवातील जुगार बंद

संवाद मीडियाच्या बातमीनंतर वाफोली जत्रोत्सवातील जुगार बंद

*संवादच्या बातमीचा इम्पॅक्ट*

 

सावंतवाडी :

बांदा पोलीस दूरक्षेत्राच्या अखत्यारीत येणाऱ्या जत्रोत्सवात जुगारास परवानगी अशी बातमी दोन दिवसांपूर्वी संवाद मीडियाने दिली होती. संवाद मीडियाच्या बातमीनंतर केवळ दोन दिवसांत झालेल्या कालच्या वाफोली येथील जत्रोत्सवात जुगाराची पालं(बैठक) टाकण्यात आली. आणि खाकीच्या कृपाशीर्वादाने जुगाराची बैठक मोठ्या दिमाखात सुरू झाली. वाफोली जत्रोत्सवात जुगाराची मैफिल जमताच संवाद मीडियाला याबाबत माहिती मिळाली, संवाद मीडियाच्या प्रतिनिधीने वाफोली जत्रोत्सवात सुरू असलेल्या जुगाराची खात्री करून तात्काळ खाकी वर्दीच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत बातमी प्रसिद्ध केली.

जिल्ह्याच्या पोलीस खात्याची कमान शिस्तबद्ध अधिकारी म्हणून ज्ञात असलेल्या राजेंद्र दाभाडे यांच्याकडे असताना बांदा पोलीस दुरक्षेत्राच्या परिक्षेत्रात जुगाराच्या मैफिली सजतात याचे आश्चर्य वाटले. *संवाद मीडियाच्या बातमीचा इम्पॅक्ट* तात्काळ दिसून आला आणि वाफोली जत्रोत्सवात जोरदार सुरू असलेले जुगाराचे फड, मैफिल अवघ्या अर्ध्या तासात बंद केली. जुगार बंद केले तरी बांदा पोलिसांच्या कार्यक्षेत्रात जुगार सुरू झाले त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांनी मात्र पोलिसांच्या कार्यपद्धती वर नाराजी व्यक्त केली आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी जत्रोत्सवात सुरू असणाऱ्या जुगारांवर बंदी आणावी अशी आशा व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा