You are currently viewing दीपिकाची NCB चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याला कोरोणची लागण

दीपिकाची NCB चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याला कोरोणची लागण

वृत्तसार:

सूशांत सिंग प्रकरणातून मधील ड्रग्स कनेक्शन संबंधित बॉलीवूड मधील नुकतीच अभिनेत्री श्रद्दा कपूर आणि सारा अली खानची NCB कडून चौकशी सूरू होती.याचसंबंधी दीपिका पादुकोणचीही चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत सामील असलेला एक एनसीबी अधिकारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) चे डिप्टी डायरेक्टर केपीएस मल्होत्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर केपीएस मल्होत्रा मुंबईहून दिल्लीला पुन्हा गेले आहेत.
यानंतर चौकशी करणाऱ्या आणि चौकशी केल्या गेलेल्या सर्वांमध्ये खळबळ माजली आहे.
यामध्ये NCB एसआयटी टीमने दीपिकाची कसून चौकशी केली होती. या टीममध्ये केपीएल मल्होत्रा लीड करत होते.
२६ सप्टेंबर रोजी दीपिकाची साडे पाच तास चौकशी झाली. यावेळी तिला सुशांत सिंह राजपूत आणि रियाशी संबंधित प्रश्न विचारले गेले होते.
यादरम्यान दीपिकाने ड्रग्स चॅटची गोष्ट स्वीकारली होती. यावेळी ती ढसाढसा रडलीही होती. इंडिया टुडेच्या बातमीनुसार दीपिका तीनवेळा रडली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिला कडक शब्दांत सांगितले की तिने इमोशनल कार्ड खेळू नये. दीपिका पादुकोणने कबूल केले होते की ती तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशशी ड्रग्सबाबत बोलली होती, पण तिने ड्रग्स घेतल्याची गोष्ट मात्र नाकारली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =