*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी गीतकार, गायक, संगीतकार अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”धर्मवीर राजे संभाजी”*
छत्रपती संभाजी राजांना करू वंदन
धर्मवीरांचे अतुलनीय शौर्य शब्दातीतIIधृII
बालपणी हरपले राजांचे मातृ छत्र
राजमाता जिजाऊंनी केले बाळ संगोपन
बहु भाषां शिकून केले ग्रंथ साहित्य निर्माणII1II
स्वराज्य प्रेमाचे बाळकडू मिळाले घराण्यांत
वाघिणीचे मुख फाडून दात मोजणारा मर्द
न्यायनीतीने राज्य करी शिव वारसा जपूनII2II
मर्द मराठ्याचा असे जागृत स्वाभिमान
बुद्धिनिष्ठ महा पराक्रमी महा तेजवान
क्षत्रिय कुलावतंस रणवीर विद्वानII3II
*”छावा”* असे सार्थ नामाभिधान भूषण
हिंदवी स्वराज्याचा भगव्याचा राखे सन्मान
शिव पुत्रास मानाचा मुजरा कीर्ती दिगंतII4II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र
पिन.410201.Cell.9373811677.