You are currently viewing मालवण शहरात तीन नवे ट्रान्सफार्मर लवकरच कार्यान्वित

मालवण शहरात तीन नवे ट्रान्सफार्मर लवकरच कार्यान्वित

मालवण शहरात तीन नवे ट्रान्सफार्मर लवकरच कार्यान्वित

गणेश चतुर्थीपूर्वी कमी दाबाची वीज समस्या होणार दूर – मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर

मालवण
मालवण शहरातील नागरिकांना त्रासदायक ठरत असलेली कमी दाबाची वीज समस्या लवकरच सुटणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून सिंधुरत्न योजने अंतर्गत मालवण शहरासाठी तीन नवे विद्युत ट्रान्सफार्मर मंजूर झाले असून, हे ट्रान्सफार्मर येणाऱ्या गणेश चतुर्थीपूर्वी कार्यान्वित केले जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर यांनी दिली.

शहरातील फोवकांडा-पिपळ सोमवारी पेठ, महाराजा हॉटेलजवळील एलआयसी कार्यालयाजवळ आणि बोर्डिंग ग्राउंडजवळ टोपीवाला हायस्कूलच्या मागे या ठिकाणी हे ट्रान्सफार्मर बसवले जातील. या विकासकामासाठी दीपक पाटकर यांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानले आहेत.

या ट्रान्सफार्मरच्या स्थापनेमुळे मालवण शहरातील नागरिकांना सध्या भेडसावत असलेल्या वीज दाबाच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळणार आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा