You are currently viewing सदगुरु गावडेकाका महाराजांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ उपासना केंद्र कणकवलीचा १२ वा वर्धापनदिन साजरा

सदगुरु गावडेकाका महाराजांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ उपासना केंद्र कणकवलीचा १२ वा वर्धापनदिन साजरा

सदगुरु गावडेकाका महाराजांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ उपासना केंद्र कणकवलीचा १२ वा वर्धापनदिन साजरा

कणकवली

श्री स्वामी समर्थ उपासना केंद्र कणकवलीचा १२ वा वर्धापनदिन मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सद्गुरू माउली श्री श्री १०८ महंत महाधीश गावडेकाका महाराज यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. यावेळी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, बाळा रेडकर वेंगुर्ला केंद्र, पंकज कामत माड्याचीवाडी केंद्र, कलमठ ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री, एकनाथ वायंगणकर, विश्राम रासम आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत केंद्रप्रमुख विजय उर्फ दादा पावसकर यांनी केले.

याप्रसंगी सद्गुरुंनी चांगले कर्म करा, दुसऱ्याची निंदा करू नका, माणसाला पुढील प्रवासात त्याने कमावलेले धन उपयोगी पडणार नाही. त्याने कमावलेली पद, प्रतिष्ठा हि उपयोगाची नसते परंतु चांगली कर्मेच त्याचा मार्ग सुखकारक करत असतात. असा संदेश गावडेकाका महाराज यांनी दिला. यावेळी केंद्राच्या वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान कार्यक्रमामध्ये गटस्तरावर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला म्हणून कलमठ ग्रामपंचायतीच्या सफाई व पाणी कर्मचारी बांधवांचा सद्गुरू श्री श्री १०८ महंत महाधीश गावडेकाका महाराज यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गौरव मुंज, निलेश वाळके, हर्षद पटेल, रुपेश जाधव, प्रथमेश परब, अंजली पावसकर, मोरजकर, कणकवली उपासना केंद्राचे सर्व सेवेकरी, भक्तगण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश ताम्हाणेकर व प्रास्ताविक विजय पावसकर यांनी केले. तसेच सायंकाळी दिपोत्सव कार्यक्रम युवसेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा