You are currently viewing महावितरणचा कंत्राटी वीज कामगारांना मोठा दिलासा; बोनस व रजेचे वेतन दरमहा देण्याचा निर्णय

महावितरणचा कंत्राटी वीज कामगारांना मोठा दिलासा; बोनस व रजेचे वेतन दरमहा देण्याचा निर्णय

महावितरणचा कंत्राटी वीज कामगारांना मोठा दिलासा; बोनस व रजेचे वेतन दरमहा देण्याचा निर्णय

थकीत रक्कम मे 2026 च्या वेतनात मिळणार; संघटनांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई :

महावितरण कंपनीने वीज कंत्राटी कामगारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत पूर्वीप्रमाणेच बोनस व रजेचे वेतन दरमहा देण्याचा निर्णय परिपत्रकाद्वारे जाहीर केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मितीमधील कंत्राटी कामगारांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
महावितरणच्या औद्योगिक संबंध विभागाने 21 एप्रिल 2026 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, नोव्हेंबर 2025 ते ऑक्टोबर 2026 या कालावधीतील बोनस व रजेचे वेतन एकत्रितपणे ऑक्टोबर 2026 मध्ये देण्याची पद्धत लागू करण्यात आली होती. मात्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) आणि सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंतर्गत वेतन मर्यादेतील बदल लक्षात घेऊन आता पुन्हा दरमहा वेतनात बोनस व रजेचे वेतन समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच नोव्हेंबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीतील थकीत बोनस व रजेचे वेतन मे 2026 च्या वेतनात देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली रक्कम कामगारांना परत मिळणार आहे.
या निर्णयासाठी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ यांनी प्रशासन, केंद्र व राज्य सरकार तसेच ESIC कडे सातत्याने पाठपुरावा केला होता. नोव्हेंबर 2025 मध्ये दिल्ली येथे केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी वेतन मर्यादा वाढवण्याची मागणी लावून धरली होती.
दरम्यान, 16 एप्रिल रोजी राज्य ऊर्जामंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कंत्राटी कामगारांबाबत महत्त्वाचे आश्वासन देण्यात आले. संपर्क पोर्टलवर कोर्ट प्रकरणातील कामगारांची नावे स्पष्ट दाखवली जातील, प्रमुख नियोक्त्याच्या लेखी परवानगीशिवाय कामगार कपात केली जाणार नाही, तसेच दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे सांगण्यात आले.
या बैठकीस एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक, महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके उपस्थित होते. तसेच संघटनेचे पदाधिकारी निलेश खरात, सागर पवार, उमेश आणेराव, राहुल बोडके, अरुण पिवळं व प्रशांत भाम्बुर्डेकर उपस्थित होते.
दरम्यान, 16 एप्रिल रोजी मुंबईतील बांद्रा येथे झालेल्या राज्यव्यापी कामगार आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळाची लवकरच बैठक होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमने यांनी दिली.
ही माहिती केंद्रीय कार्यकारिणी सचिव सिंधुदुर्गचे आनंद लाड यांनी दिली.

______________________________

*संवाद मीडिया*

*🚗 करिअरची सुवर्णसंधी! 🚗*

*माई ह्युंदाई (Mai Hyundai)*

*27 वर्षांचा विश्वास • सततची प्रगती • उज्ज्वल भविष्य*

* माई ह्युंदाई (Mai Hyundai) तर्फे कुडाळ आणि कणकवली येथील शोरूमसाठी उत्साही आणि कुशल उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

*📌 उपलब्ध पदे:*

*▪️ सेल्स एक्झिक्युटिव्ह*
*▪️टीम लीडर*
*▪️सर्व्हिस ॲडव्हायझर*
*▪️CRM (सेल्स)*
*▪️CRM (सर्व्हिस) मॅनेजर*

*👉🎓 पात्रता:*

*पदवीधर / डिप्लोमा / पदवीधर उमेदवार*
*अनुभवी उमेदवारांना प्राधान्य
फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात*

*💼 सुविधा:👇*

*✔ प्रोव्हिडेंट फंड (PF)*
*✔ ग्रॅच्युटी*
*✔ वार्षिक बोनस*
*✔ मासिक इन्सेंटिव्ह*
*✔ ट्रॅव्हलिंग भत्ता*.

*📍 कामाचे ठिकाण:*

*Mai Hyundai*

*वृक्षवल्ली नर्सरी कंपाउंड, वागडे, कणकवली*

*Mai Hyundai, उद्योगनगर, मुंबई-गोवा महामार्ग, कुडाळ*
*📅 अर्ज कसा कराल?👇*

*👉 इच्छुक उमेदवारांनी सविस्तर बायोडेटा व फोटोसह*
*🕙 सकाळी 10 ते 🕕 संध्याकाळी 6 या वेळेत प्रत्यक्ष भेट द्यावी*

*📞 संपर्क:*

*📱 74100 06037*

*📧 tmsnd@maihyundai.in*

*✨ 27 वर्षांचा विश्वास – Mai Hyundai सोबत उज्ज्वल करिअर घडवा! ✨*

*(नियम व अटी लागू)*

*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/202054/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा