युवा उद्योजक बाबा टोपले यांना समाजरत्न पुरस्काराने गौरव
दोडामार्ग
भेडशी खालचा बाजार येथील युवा उद्योजक आणि शासकीय ठेकेदार दत्ताराम ऊर्फ बाबा टोपले यांना जनजागृती सेवा संस्था, पुणे यांच्या वतीने समाजरत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. हा पुरस्कार वितरण समारंभ नुकताच कणकवली येथे पार पडला.
बाबा टोपले यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला. त्यांच्या या सन्मानानंतर विविध ठिकाणाहून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
