You are currently viewing श्री राम मंदिर निधी समर्पण अभियान देवगड मध्ये सुरू…

श्री राम मंदिर निधी समर्पण अभियान देवगड मध्ये सुरू…

देवगड

अयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारण्यासाठी श्रीराम मंदिर निधी समर्पन अभियान देवगड तालुक्यामध्ये सुरु झाले असून या पाश्र्वभुमीवरती शुक्रवारी हडपीड स्वामी समर्थ मठ येथून या रथाची सुरुवात होवून दिवसभर हा रथ तालुक्यामध्ये विविध ठिकाणी वाजत गाजत फिरविण्यात आला व या रथाचे स्वागतही गावागावामध्ये मोठया प्रमाणात करण्यात आले. राम जन्मभुमी तिर्थक्षेत्र न्यास अयोध्या येथील हा रथ देवगड तालुक्यातील शुक्रवारी सकाळी ९.३० वा. हडपीड स्वामी समर्थ मंगल कार्यालयामध्ये आगमण झाले या रथाचे देवगड तालुक्याच्यावतीने भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले. तेथून शिरगांव, लींगडाळ तिठा, तळेबाजार व दुपारी १२ वा देवगड येथे बर्वे लायब्ररीच्या पटांगणामध्ये आगमन झाले. तेथून देवगड बाजारपेठ, किल्ला हनुमान मंदिर, आनंदवाडी श्रीराम मंदिरामध्ये पर्यंत जल्लोषी स्वागत या रथाचे ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले. या नंतर हा रथ जामसंडे येथून वाडा, पडेल कँन्टिंग, विजयदुर्ग, गिर्ये ,व सायंकाळी ८ वा. सुमारास हुर्शी फाटक दुकान येथून कणकवलीकडे प्रयाण झाले. या रथाचे देवगड तालुक्यामध्ये विविध ठिकाणी मोठया उत्साहात व फटाक्यांच्या आतषबाजीत ढोल ताशांच्या गजरात प्रभु रामचंद्र कि जय, जय श्रीराम जयजय श्रीराम, भारत माता कि जय अशा घोषणा देत अखंड देवगड तालुका दुमदुमुन गेला होता. भक्तीमय वातावरण आनंदाच्या उत्साहामध्ये शुक्रवारी देवगड तालुक्यातील या रथाचे स्वागत करताना ग्रामस्थांच्या चेह-यावरती हानंदाचे हास्य चेहरे उत्साहाने उमटुन दिसत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 5 =