You are currently viewing आडाळी येथील एमआयडीसीत उद्योग धंदे आणण्याची केंद्रीय उद्योग मंत्री खा.राणेंची ग्वाही

आडाळी येथील एमआयडीसीत उद्योग धंदे आणण्याची केंद्रीय उद्योग मंत्री खा.राणेंची ग्वाही

दोडामार्ग

केंद्रीय उद्योग मंत्री खा.नारायण राणे यांच्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीचा प्रश्न वेगाने मार्गी लागणार आहे.याबाबत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सकारात्मकता दर्शवली असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सांगितले.
केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची राजेंद्र म्हापसेकर यांनी दिल्ली येथे जात भेट घेत शुभेच्छा दिल्या व दोडामार्ग तालुक्याच्या विकास कामांबाबत चर्चा केली.यावेळी आडाळी येथील एमआयडीसी च्या मुद्द्यांवर राजेंद्र म्हापसेकर यांनी चर्चा केली.याठिकाणी नेस्ले कंपनीच्या धर्तीवर कंपन्या आल्यास रोजगार निर्मिती होऊ शकतो अशी मागणी म्हापसेकर यांनी खा.राणे यांच्याकडे केली.

यावेळी खा.राणे यांनी या प्रकल्पाबाबत व उद्योगांबाबत राज्य सरकार प्रशासनाशी चर्चा केली जाईल.राज्य सरकारने प्रतिसाद न दिल्यास केंद्राच्या माध्यमातून उद्योग आणले जातील अशी ग्वाही उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिल्याचे राजेंद्र म्हापसेकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 5 =