“मोशीतील नऊ जीवांचा बळी हा अपघात नाही, तर भाजप आणि शिंदे सरकारच्या असंवेदनशील कारभाराचा बळी आहे!” – ॲड. उमेश खंदारे
*पिंपरी-चिंचवड*
पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेत नऊ निष्पाप कामगारांचा झालेला मृत्यू हा केवळ अपघात नसून सत्ताधाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा, प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा आणि वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या व्यवस्थेचा परिणाम आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बहुतांश कामगार हे कष्टकरी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित कुटुंबातील होते. त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधार हिरावला गेला आहे. अशा वेळी शासनाबरोबरच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांनीही मानवतेच्या भावनेतून पीडित कुटुंबांसाठी सक्षम आर्थिक मदत जाहीर करणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता असून शहरातील पाच आमदार, एक खासदार आणि संपूर्ण महायुतीची राजकीय ताकद येथे आहे. तरीही मोशी कचरा डेपोतील सुरक्षाव्यवस्था का ढासळली? सुरक्षेचे निकष का पाळले गेले नाहीत? संबंधित विभागांवर प्रभावी देखरेख का ठेवली गेली नाही? या प्रश्नांची उत्तरे नागरिकांना मिळालीच पाहिजेत.
या दुर्घटनेनंतर पालकमंत्री आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली; मात्र त्यानंतर पीडित कुटुंबांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन करणे, त्यांच्या वेदना जाणून घेणे आणि मानसिक आधार देणे आवश्यक असताना ते झालेले दिसत नाही. संकटाच्या काळात फोटोसेशन नव्हे, तर माणुसकीची साथ आणि प्रत्यक्ष कृती अपेक्षित असते, केवळ शोकसंदेश देऊन जबाबदारी संपत नाही.
पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसची ठाम मागणी आहे की, मृतांच्.या कुटुंबियांना सक्षम आर्थिक मदत, कुटुंबातील एका पात्र सदस्याला नोकरी, मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी, तसेच या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या अधिकारी, कंत्राटदार आणि संबंधित व्यक्तींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी. यासोबतच मोशी कचरा डेपोचे स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षण करून राज्यातील सर्व कचरा प्रकल्पांचे सुरक्षा लेखापरीक्षण सार्वजनिक करण्यात यावे.
पीडित कुटुंबांना न्याय, सन्मानजनक पुनर्वसन आणि दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ॲड. उमेश खंदारे यांनी व्यक्त केले.
_________________________
*संवाद मीडिया*
*प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!!*
*कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण*
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आणि स्थापनेपासून *”अ”* दर्जा प्राप्त *महाविद्यालये*
*बारावी नंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू….!!!*
1) *गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण.*
*कॉलेज कोड:* *11165*
*👇अभ्यासक्रम*
▪️कृषी पदवी- BSc. (Hons.) Agriculture
प्रवेश क्षमता- 180
*संपर्क : 9421154594 9421230915 9405071319*
www.gncamp.org
2) *जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी पालवण*.
*देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय*
*कॉलेज कोड:* *11311*
*👇अभ्यासक्रम.*
▪️कृषी पदवी- BSc. (Hons.)Agriculture
प्रवेश क्षमता- 60
*संपर्क : 8600879426 7588868705*
www.jwcagri.org
3) *डॉ.बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मांडकी पालवण*
*कॉलेज कोड:* *15196*
*👇अभ्यासक्रम.*
▪️कृषी अभियांत्रिकी पदवी-(Agricultural engineering)
प्रवेश क्षमता- 80
*संपर्क: 9421154594 7588868705*
www.dbmcaetmp.org
*टीप : इच्छुक विद्यार्थ्यांचे फॉर्म कॉलेजमध्ये भरून देण्यात येतील*
*प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी आमच्या महाविद्यालयाचे व्हाट्सअप channel जॉईन करा*
https://whatsapp.com/channel/0029Vb2OWKRJENxsbWsAQ41a
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/207281/
https://www.facebook.com/share/p/1LPFm2kaQQ/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
