You are currently viewing असरोंडी गावातील तरुणांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

असरोंडी गावातील तरुणांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

शिवबंधन बांधून आ. वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत

कणकवली

 

18 डिसेंबर ला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्शवभूमीवर मालवण तालुक्यातील असरोंडी गावातील भाजपचे कार्यकर्ते व माजी सरपंच श्री. दिलीप (छोटू) गावकर यांच्यासह अनेक तरूणांनी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या उपस्थितीत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.कणकवली विजय भवन येथे आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत (भाऊ )सावंत, शाखा प्रमुख सुनील सावंत, युवा शाखा प्रमुख ऋषिकेश सावंत, जेष्ठ शिवसैनिक मोहन परब, संतोष सावंत, बबलू परब उपस्थित होते.

असरोंडी गावात मागील पंचवीस वर्षे भाजपची एक हाती सत्ता असून देखील गावाचा विकास न करता फक्त स्वतःच्या विकासावर भर देण्याचे काम आता पर्यंत भाजप पदाधिकारी तसेच सध्याचे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून करण्यात आल्याचा आरोप या प्रवेश कर्त्यांनी केला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून असरोंडी गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हा प्रवेश केल्याचे प्रवेश कर्त्यांनी सांगत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवीन सुशिक्षित चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले.

यामध्ये असरोंडी भाजप कार्यकर्ते आणि माजी सरपंच दिलीप (छोटू) गावाकर यांच्यासह अनंत पोईपकर,अजय गावडे, आदित्य सावंत, प्रमोद सावंत, दयानंद कदम, प्रतीक सावंत,अमोल गावडे, अमित गावडे, संतोष सावंत, प्रतीक परब, गौरव धुरी, काशीनाथ धुरी, संदीप सावंत, अजित परब, सौरभ बागवे, तुषार चव्हाण, भालचंद्र सावंत, मनीष सावंत, सचिन सावंत, रोषण गावडे, सर्वेश सावंत,विनायक सावंत,मयूर घाडी गावकर, प्रियेश घाडीगावकर, कृष्णा जंगले, बाबू कोकरे, विश्वनाथ आंबेरकर आदी कार्यकर्त्यांनी एकजुटीने शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत असरोंडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी निस्वार्थीपणे झटण्याची शपथ सर्वांनी घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा