हंटर विमान परिसराची सिंधुदुर्गनगरी येथील मुख्यालय पत्रकार संघाकडून सफाई…

हंटर विमान परिसराची सिंधुदुर्गनगरी येथील मुख्यालय पत्रकार संघाकडून सफाई…

ओरोस :

1971 च्या भारत-पाक युद्धात ऐतिहासिक कामगिरी बजावल्यानंतर मागील काही वर्षे सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुलाच्या परिसरात दिमाखात उभ्या असलेल्या हंटर विमान परिसराची मुख्या लय पत्रकार  संघाच्या वतीने बुधवारी स्वच्छता करण्यात आली. अनेक पर्यटक हे विमान पाहण्यासाठी येतात. तसेच शालेय विद्यार्थांच्या सहलीही या ठिकाणी येतात. मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखली राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे तसेच मुख्यालय पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नंदकुमार आयरे, सचिव संजय वालावलकर, बाळ खडपकर, लवू म्हादेश्र्वर, दत्तप्रसाद वालावलकर, विनोद दळवी, विनोद परब, गिरीश परब, मनोज वारंग, सतीश हर्मलकर, प्रसाद पाताडे, अमोल तांबे, तसेच सफाई कामगार श्री हुले, श्रीमती यशस्वी बागवे, उज्वला निकम, आदी सह भागी झाले होते.

मुख्यालय पत्रकार संघाकडून दरवर्षी अनेक उपक्रम राबविले जातात. कोरोना कालावधीत प्रशासनाकडून दुर्लक्षित झालेला हा परिसर झाडी झुडपे वाढल्याने व शेवाळ सुकल्याने काहीसा अस्वच्छ झाला होता. हंटर विमान ठेवल्याने ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झालेला हा परिसर स्वच्छ करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी शुभागी साठे यांनी भेट देउन शुभेच्छा दिल्या  व या विमानाची रंग रंगोटी आणि सुविधा पुरविणयाबाबत प्राधीकरणाचे लक्ष वेधले.

प्रतिक्रिया व्यक्त करा