You are currently viewing टाईम शेड्युल ठरवून चौपदरीकरणातील जनतेचे प्रश्न सोडवा; आमदार नितेश राणे

टाईम शेड्युल ठरवून चौपदरीकरणातील जनतेचे प्रश्न सोडवा; आमदार नितेश राणे

कणकवली
चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या लोकांचे प्रश्न आजही निकाली लागलेले नाहीत.निवाडे,मोबदला देण्याचे काम अजूनही दिरंगाईने चालू आहे.हे असे किति दिवस चालणार ? टाईम शेड्युल ठरवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा अशा सूचना वजा चर्चा भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रांत अधिकारी वैशाली राजमाने यांच्या समवेत केली.तर मार्च पर्यंत ही सर्व प्रकरणे निकाली काढून चौपदरीकरणातील जनतेचे प्रश्न सोडविले नाहीत तर जनतेसाठी टोकाची भूमिका घ्यावी लागेल असा इशाराही यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.

कणकवली तालुक्यातील महामार्ग चौपदरीकरणात जनतेच्या अडकलेल्या प्रश्नावर आज प्रांत कार्यलयात आमदार नितेश राणे यांनी प्रांताधिकारी यांच्या सोबत चर्चा केली.यावेळी जिल्हापरिषद बांधकाम सभापती बाळा जठार, सभापती दिलीप तळेकर,माजी सभापती रत्नप्रभा वळंजू,भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,विभागीय अध्यक्ष सूर्यकांत भालेकर,तरेळे सरपंच साक्षी सुर्वे,उपसरपंच दिनेश मुद्रस,आणि ग्रामपंचयत सदस्य उपस्थित होते.

सुमारे २००प्रकरणे कोणत्याना कोणत्या कारणामुळे प्रलंबित आहेत.मार्च पर्यंत ही सर्व प्रकरणे निकाली काढली जावीत जेणेकरून जनतेला सातत्याने फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.कणकवली प्रांत अधिकारी ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत आहेत मात्र त्यांना प्रशासकीय आणि इतर खात्यातील अधिकाऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.जर आशा पद्धतीने पाच,दहा वर्षे मोबदले अडकून असतील तर जनतेने काय करावे ?आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत,तरी प्रशासन स्थरावर कामे होत नसतील तर जनतेसाठी प्रसंगी टोकाची भूमिका घ्यावी लागेल.आज चौपदरीकरणाचे बरंच काम झालेले आहे.उद्या हे ठेकेदार इथून गेल्यानंतर त्यांच्याशी निगडित असलेले प्रश्न तसेच राहणार,त्यांच्या मशिनरीज येथे काम करतात तो पर्यंत त्यांच्याकडून जतेला भेडसावणारे प्रश्न सोडवून द्या.

पावसात पाणी भरते त्यामुळे जे नुकसान होते त्याला ठेकेदार कंपनी आजच हवेतसे काम करून स्थानिकांचे प्रश्न सोडवू शकते.महामार्ग अधिकाऱ्यांनी ती मानसीकता ठेवून काम केले पाहिजे.काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खारेपाटण-नडगिवे मधील लोकांनी उपोषण केले ते मी आश्वासन देऊन सोडविले मात्र छोटे छोटे प्रश्न अधिकारी पातळीवर सोडवून निकाली काढत जा, जनतेचे समाधान करा. असेही आमदार नितेश राणे यांनी प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा करतांना सांगितले.यावेळी प्रांताधिकारी राजमाने यांनी आपण मार्च पर्यत हे प्रश्न निकाली काढतो असे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + eleven =