You are currently viewing इंधन दरवाढीविरोधात कणकवलीत सेनेचा भव्य मोर्चा…

इंधन दरवाढीविरोधात कणकवलीत सेनेचा भव्य मोर्चा…

इंधन दरवाढीविरोधात कणकवलीत सेनेचा भव्य मोर्चा

कणकवली

कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही, पेट्रोल डिझेलचे दर कमी करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत कणकवलीत शिवसेनेने भव्य मोर्चा काढत केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीबद्दल निषेध केला. कणकवली पटकी देवी येथून बाजारपेठ मार्गे निघालेला मोर्चा महामार्ग वरून प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चचे नेतुत्व शिवसेना नेते संदेश पारकर व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी बैलगाडीत बसून स्वतः बैलगाडीचे सारथ्य केले. शिवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी विविध घोषणांनी कणकवली दणाणून सोडली.

या मोर्चात जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, शिवसेना युवानेते संदेश पारकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक कन्हय्या पारकर, गटनेते सुशांत नाईक, नगरसेविका मानसी मुंज, जि.प. सदस्य संजय आंग्रे, जि.प. सदस्या स्वरूपा विखाळे, जि.प.सदस्या राजलक्ष्मी डीचवलकर, प.स.सदस्य मंगेश सावंत, अनिल हळदिवे, संदेश पटेल, सचिन सावंत, अँड.हर्षद गावडे, शेखर राणे, सुनिल पारकर, बाळु मेस्त्री, राजु राठोड, बंडू ठाकूर, ललित घाडीगांवकर, शरद वायंगणकर, अनुप वारंग, रुपेश आमडोसकर, बाबु रावराणे, बाबु पेडणेकर, बंड्या रासम, गोट्या कोळसुलकर, आनंद आचरेकर, राजु रावराणे, दया कुडतरकर, रमा सावंत, वैदेही गुढेकर, प्रतिक्षा साटम, मिनल म्हसकर, मिनल तळगावकर, साक्षी आमडोसकर, मिनल म्हसकर, मानसी राणे, पूजा घाडीगांवकर, शितल बाणे, अरविंद राणे, सुदाम तेली, बापु नर, आपा तावडे, विलास गुढेकर, बाळु पारकर, सचिन पवार, प्रकाश मेस्त्री, नासिर खान, सिद्धेश राणे, तेजस राणे, रिमेश चव्हाण, भास्कर राणे, संतोष राणे, भिवा परब, प्रदीप सावंत, फैय्याज खान, सत्यवान राणे, प्रशांत राणे, योगेश मुंज, अमित मयेकर, शिवाजी राऊत आदी कार्यकर्ते,  पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या निषेध मोर्चात विविध फलक घेत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोदी सरकारच्या विरोधात जनतेमध्ये असलेला संताप व पेट्रोल-डिझेल दरवाढीने जनतेची झालेली निराशा यामुळे जनतेमधून केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त होत आहे. व त्याचाच एक भाग म्हणून हा निषेध मोर्चा काढण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यांनी संदेश पारकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देत बाजारपेठेत एकच घोषणाबाजी केली. ज्या बैलगाडीत संदेश पारकर व सतीश सावंत एकत्र सारथ्य करत होते त्या बैलगाडीच्या बैलांचा एक कासरा पारकर यांच्या हाती तर दुसरा कासरा सतीश सावंत यांच्या हाती होता. या दोघांच्या नेतृत्वाखालीच हा निषेध मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयात येऊन धडकला.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 8 =