You are currently viewing भाजप बूथ कमिटी पणदूर च्या वतीने सर्व शिक्षकांचा कोव्हिडं योध्दा म्हणून गौरव

भाजप बूथ कमिटी पणदूर च्या वतीने सर्व शिक्षकांचा कोव्हिडं योध्दा म्हणून गौरव

*भाजप बूथ कमिटी पणदूर व  पणदूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून शिक्षक दिनाचे औचित्य साधत आज पणदूर गावातील शाळा व माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचे भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने सर्व शिक्षकांचा कोव्हिडं योध्दा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

सावंतवडी / प्रतिनिधी :-

यावेळी बूथ कमिटी अध्यक्ष दीपक साईल, सरपंच दादा साईल, तालुका कार्यकारिणी सदस्य जगदीश उगवेकर, ग्रामपंचायत माजी सरपंच तथा सदस्य शिवराम पणदूरकर, ग्रामपंचायत सदस्य अनघा गोडकर, माजी सरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत साईल, रमेश राणे, बबन राऊळ, प्रदीप जाधव, ग्रामसेविका सपना मसगे आदी उपस्थित होते.

कोव्हिडं 19 या रोगाने आपल्या देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला त्रासलेले असताना संपूर्ण भारत एकजूट करून covid-19 या जागतिक महामारीचा सामना करीत आहे अशा कठीण प्रसंगी पणदूर गावातील तीन अलगीकरण कक्षांमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणार्‍या शिक्षकांचा यावेळी कोव्हिडं योध्दा म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या वेळी दादा साईल म्हणाले,पणदूर गावात मे महिन्याच्या सुरुवातीलाच पहिल्या दोन  आठवड्यात सहा रुग्ण सापडेल हे रुग्ण  सापडल्यानंतर पणदूर गावातील ग्रामस्थांनी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र या शिक्षकांच्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या खबरदारी बाबत वेळच्या वेळी येथील नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळाल्याने स्थानिक नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर होण्यास मदत मिळाली आहे , त्यानंतर आजपर्यंत आमच्या गावात एकही रुग्ण आढळून आलेला नाही, यामध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांचे ते आभार व्यक्त करतो अशी भावना यावेळी पणदुर गावचे प्रथम नागरिक सरपंच दादा साईल यांनी व्यक्त केली,  यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना सन्मान पत्र देवून गौरव करण्यात आला, यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार ग्रामपंचायत सदस्य शिवराम पणदुरकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 5 =