You are currently viewing 10 वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडीच्या वतीने अभिनंदन

10 वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडीच्या वतीने अभिनंदन

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधीक्षक तथा स्थानिक अध्यक्ष श्री.जयेंद्र रावराणे यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी प्रतिनिधी

वैभववाडी तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडीचा निकाल 100% टक्के लागला आहे. कु पौरस मधुकर इंदप प्रशालेत प्रथम तर तालुक्यात चवथा क्रमांक मिळवला आहे, कु तमिष गजानन अडुळकर प्रशालेत द्वितीय तर तालुक्यात सहावा क्रमांक मिळविला आहे,कु शिवतेज नवीन घोडगे प्रशालेत तृतीय तर तालुक्यात सातवा क्रमांक मिळवला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्था व प्रशालेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अधिक्षक तथा स्थानिक अध्यक्ष श्री.जयेंद्र रावराणे मुख्याध्यापक नादकर बी.एस., प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी ,पालक,विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =