*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सावळे सुंदर…*
सावळे सुंदर रूप,
दिसे मला मनोहारी!
माझ्या नयनात वसे,
सदैव तोच श्रीहरी !…१
गळ्यात तुळशीहार,
वरी मुकुटाचा थाट !
कानी दिसती कुंडल,
असा विठ्ठलाचा थाट !…२
विटेवरी उभा राही,
तोचि जगाते उध्दारी !
रुक्मिणी उभी वामांगी,
साथ विठ्ठलास करी !..३
जगताच्या कल्याणास,
पांडुरंग वाळवंटी!
त्याच्या दर्शनास होई !
तिथे वैष्णवांची दाटी !…४
सावळ्या विठुरायाच्या,
मोरपीस माथी शोभे!
*कृष्ण – विठ्ठल* दोघेही,
एकरूप तिथे भासे !…५
उज्वला सहस्रबुद्धे,पुणे