You are currently viewing पाट तलाव सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न
Oplus_16908288

पाट तलाव सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ; पर्यावरण संवर्धन व पर्यटन वाढीस चालना

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील पाट येथील तलाव सुशोभीकरण या महत्त्वपूर्ण विकासकामाचे भूमिपूजन कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. ग्रामविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या कामामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून स्थानिक नागरिकांना आणि भाविकांना आकर्षक व स्वच्छ परिसर उपलब्ध होणार आहे.

तलाव परिसर हा गावाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू मानला जातो. या सुशोभीकरण प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धन, पर्यटन वाढ तसेच ग्रामस्थांसाठी विरंगुळ्याचे सुंदर ठिकाण निर्माण होण्यास मदत होणार आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निलेशजी राणे सातत्याने प्रयत्नशील असून विविध विकासकामांद्वारे कुडाळ तालुक्याच्या प्रगतीला नवी दिशा देत आहेत.

या कार्यक्रमावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, जिल्हा परिषद सदस्य रूपेश कानडे, दीपक नारकर, सौ. आरती पाटील, तालुका प्रमुख विनायक राणे, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, समाधान परब तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा