You are currently viewing स्वयंसिध्दा पुरस्कार सोहळा

स्वयंसिध्दा पुरस्कार सोहळा

पुणे :

 

स्वयंसिद्धा पुरस्कार सोहळा, कवीसंमेलन व परिसंवाद असा कार्यक्रम, स्वयंसिद्धा प्रतिष्ठान पिं. चिं. पुणे शहर च्या वतीने, शनिवार दिनांक १३ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता, प्रतिभा महाविद्यालय, काळभोर नगर, चिंचवड, पुणे, येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लोकमतचे संपादक संजय आवटे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिभा महाविद्यालयाच्या उपप्राचार्य क्षितिजा गांधी यांची उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमांमध्ये “पत्रकार क्षेत्रातील स्त्रियांचे योगदान व आव्हाने’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाच्या वक्त्या, सकाळच्या निवृत्त उपसंपादक नयना निर्गुण तसेच पत्रकार प्राजक्ता जोशी असणार आहेत. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या, शुभांगी घनवट व पत्रकार प्राजक्ता जोशी यांना स्वयंसिद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी निमंत्रितांचे कवीसंमेलन आयोजित केले आहे. अशी माहिती स्वयंसिद्धाच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी दिली.

 

9822018281

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + ten =