कणकवली :
महाराष्ट्र राज्याचे हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती १ जुलै म्हणून साजरी केली जाते. तसेच कृषी दीन म्हणून ही हा दिवस साजरा केला जातो. त्यात शेतकरी, कष्टकऱ्यांचा सत्कार करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून डामरे तिवरे गावामध्ये जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळेत कृषीदीन साजरा करण्यात आला. उपस्थित शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नंतर कृषीदिंडी काढण्यात आली. यावेळी कृषीकन्या पायल डोंगरे, कांचन गायकवाड, हर्षदा वरुटे, सानिका गोडसे, तन्वी अदम, अमिषा. के. आर, नंदना अनिल, निर्मला परब, वैष्णवी भोसले, मानसा प्रिती तसेच शाळेच्या प्राध्यापिका जाधव मॅडम, सहकारी शिक्षिका, शिक्षक उपस्थित होते.