You are currently viewing आषाढी एकादशीनिमित्त “जातं” प्रतीकातून ओव्यांचा अनोखा आविष्कार…

आषाढी एकादशीनिमित्त “जातं” प्रतीकातून ओव्यांचा अनोखा आविष्कार…

आषाढी एकादशीनिमित्त “जातं” प्रतीकातून ओव्यांचा अनोखा आविष्कार…

सावंतवाडी

येथील बी.एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट, सावंतवाडीची विद्यार्थिनी अमिषा तेंडोलकर हिने आषाढी एकादशीनिमित्त अत्यंत सर्जनशील आणि लक्षवेधी इंस्टॉलेशन कलाकृती सादर केली आहे. संत जनाबाईंच्या ओव्यांचा आधार घेत, टायपोग्राफीचा कल्पक वापर करून तिने ही आगळीवेगळी कलाकृती साकारली आहे.

अमिषाच्या या इंस्टॉलेशनमध्ये तिने “जातं” या पारंपरिक प्रतीकाचा प्रभावी वापर केला आहे. जात्यातून अक्षरं बाहेर पडताना दाखवून, त्या अक्षरांचं रूपांतर पीठाच्या स्वरूपात केल्याचे तिने दर्शवले आहे. हे पीठ म्हणजे संत जनाबाईंच्या ओव्यांचा आत्मा, त्यांची निस्सीम भक्ती आणि त्यांच्या श्रमशीलतेचे प्रतीक आहे, असं अमिषाने स्पष्ट केलं. या कल्पक संकल्पनेच्या मांडणीसाठी आणि टायपोग्राफिक सादरीकरणासाठी तिला सुलेखनकार प्रा. सिद्धेश नेरुरकर यांचे मार्गदर्शन लाभले. अमिषाची ही कलाकृती आषाढी एकादशीच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात संत जनाबाईंच्या कार्याला एक आधुनिक आणि कलात्मक आदरांजली ठरली आहे. तिच्या या अभिनव प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा