*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पांडुरंग विठ्ठल…..*
विठ्ठल भेटला मला
आज विठ्ठल भेटला
टीव्हीच्या माध्यमातूनी
पांडुरंग हा भेटला ||
डोईवरी तुळस ती
शोभे तुज साज माय
अखंड नामजप तो
चाले पंढरीची वाट||
पांढरे धोतर टोपी
बुक्का टिळा असे माथी
हाती टाळ मुखी नाम
उड्या मारे वारकरी ||
हाती चिपळी मृदुंग
गाता अभंगाचे बोल
हास्य मुखी मनोहर
ओढ पांडुरंग थोर ||
पालखी तुकारामाची
संत सोपान मुक्ताईची
निवृत्ती ज्ञानदेव माय
भेटी निज पांडुरंगा ||
आषाढी एकादशी
जत्रा ती पंढरपुरी
नामघोष आसमंत
गाज विठ्ठल विठ्ठल ||
विठ्ठल भेटला मला
घरी आला पांडुरंग
नित्य दर्शन दे मज
बा पांडुरंग विठ्ठल ||
………………………..
©पल्लवी उमेश
जयसिंगपूर
5/7/2025