You are currently viewing न्यू इंग्लिश स्कूल हेत येथे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सत्कार

न्यू इंग्लिश स्कूल हेत येथे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सत्कार

वैभववाडी:

न्यू इंग्लिश स्कूल हेत या हायस्कूलमध्ये सन 1992 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांकडून सलग तिसऱ्या वर्षी इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कै. बाळकृष्ण राजबा फोंडके पारितोषिक योजनेअंतर्गत आज बक्षीस वितरण करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.वसंत खानविलकर, मुख्या.श्री.कांबळे सर, आगे सर, पांचाळ सर, सुत्रसंचालक सौ. शिंदे मॅडम, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य,  प्रतिष्ठित ग्रामस्थ, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी प्रतिनिधी ग्रामविकास अधिकारी श्री.गजानन कोलते, भाजप कार्यालय प्रमुख श्री.अनंत फोंडके, प्राथ.शिक्षक श्री अनंत फोंडके उपस्थित होते.

1992 एसएससी दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून सन 2023 पासून हाय स्कूलमध्ये इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येतो. प्रथम क्रमांक 2100, द्वितीय क्रमांक 1550 तृतीय क्रमांक 1100 व सर्वांना सन्मान चिन्ह असे या पारितोषिक योजनेचे स्वरूप आहे.

आपल्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी तसेच शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करावी आणि हे हायस्कूल निर्माण करण्यासाठी ज्या महनीय व्यक्तींनी खूप कष्ट केले आणि ही शिक्षणाची गंगोत्री आपल्या हेत गावात न्यू इंग्लिश स्कूल हेत च्या रूपाने आणली ते महनीय व्यक्तिमत्व म्हणजे कै. बाळकृष्ण राजबा फोंडके यांचे सर्वांना पुण्यस्मरण व्हावे हा या योजनेमागील उद्देश आहे. 1992 च्या माजी विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारची अविरत चालणारी प्रशंसनीय योजना आखल्याबद्दल पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांकडून एसएससी बॅच 1992 च्या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा