You are currently viewing सिंधुदुर्ग प्रीमियर लीग ( मुंबई SPL ) मध्ये NCC नरगोल देवगड संघ अजिंक्य

सिंधुदुर्ग प्रीमियर लीग ( मुंबई SPL ) मध्ये NCC नरगोल देवगड संघ अजिंक्य

सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड्स सर्कल मुंबई आयोजित नेरुळ नवी मुंबई येथे झालेल्या जिल्हा मर्यादित मुंबई SPL या क्रिकेट स्पर्धेत NCC नरगोल संघाने बलाढ्य वरद इलेव्हन सिंधुदुर्ग संघाचा पराभव करत मुंबई SPL चे विजेते पद पटकावले तसेच तृतीय क्रमांकांचा मानकरी हे स्वयंभू इलेव्हन ओवळीये आणि कोकण पॅकर्स देवगड या संघाने पटकावले तसेच या क्रिकेट सामन्यामध्ये 32 संघ मालकाने बलाढ्य प्लेयर उतरवले होते
विजेते NCC नरगोल संघाला आयोजन कमिटी तर्फे आकर्षक असा भला मोठा चषक आमदार नितेश राणे साहेब यांचा सौजन्याने रोख रुपये 30,000 चा प्राईज देण्यात आला व उपविजेते वरद इलेव्हन संघाला आयोजन कमिटी तर्फे आकर्षक चषक आणि माजी खासदार निलेश राणे साहेब यांचा सौजन्याने रोख रुपये 20,000 चा प्राईज देण्यात आला तसेच तृतीय क्रमांक स्वयंभू इलेव्हन ओवळीये आणि कोकण पॅकर्स देवगड या दोन्ही संघाला डॉ अमित दुखंडे यांचा सौजन्याने आकर्षक चषक व सौ वैशाली ताई राणे यांनी प्रत्येकी संघाला रोख रुपये 5,000 प्राईज देण्यात आले तसेच इतर मान्यवर मंडळी कडून इतर अनेक पारितोषिक देण्यात आली या स्पर्धेचे आयोजन चेतन वि रासम , अनिल मातेफोड , वसंत परब , दीपक रासम , स्वप्नील तेली , महेश चव्हाण , अमित धुरी यांनी केले व त्यांना साथ आमदार नितेश राणे साहेब , सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब , सौ वैशाली राणे ताई , अमित दुखंडे , विनायक अपराज , दीपक परब , तुकाराम रासम , राजन गावडे , प्रथमेश सावंत आणि इतर मान्यवर मंडळींनी दिली
तसेच पंच म्हणून मेघशाम होडावडे कर आणि संतोष राऊत यांनी केले आणि पूर्ण सामान्यांचे सामनाधिकारी चे काम सतीश मनचेकर यांनी सांभाळले आणि गुण लेखक तानाजी रासम आणि मंगेश राणे यांनी पार पाडले आणि समालोचकांची जबाबदारी राजा सामंत , वैभव गावडे , सिद्धेस कास्ते , आबा कोचरेकर , मांजरेकर यांनी हिंदी मालवणी मराठी भाषेत कॉमेंट्री करून सर्व मान्यवर मंडळींची मने जिंकली

प्रतिक्रिया व्यक्त करा