You are currently viewing वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे पुरस्कार जाहीर

वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे पुरस्कार जाहीर

संघाचे चेअरमन महेश संसारे यांनी केली नावे घोषित

वैभववाडी :

वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. तालुक्यातील पाच शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. संघाचे चेअरमन महेश संसारे यांनी आज या नावांची पत्रकार परिषदेत घोषणा केली.
गेल्यावर्षी पासून तालुका संघाकडून शेतकऱ्यांना पुरस्कार दिले जात आहे. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी पाच शेतकरी निवडण्यात आले.यांची नावे श्री. संसारे यांनी आज जाहीर केली.

त्यानुसार त्यांनी उत्कृष्ट भातपिक शेतकरी पुरस्कार मनोहर पांडुरंग खरात (मांगवली) उत्कृष्ट काजु उत्पादक म्हणुन रामचंद्र बाळकृष्ण फोंडके (हेत)उत्कृष्ट ऊस उत्पादक शेतकरी म्हणुन प्रकाश रामचंद्र पालकर (सोनाळी )प्रयोगशील शेतकरी म्हणुन रमेश श्रीपत चव्हाण (कुंभवडे )आणि उत्कृष्ट पशुपालक म्हणुन सचिन विजय कोलते (करूळ )यांना जाहीर करण्यात आले आहेत.या निवडी निवड समितीने केल्या आहेत.शेती आणि शेतीपुरक व्यवसायात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतुने गेल्या काही वर्षापासुन संघाने हे पुरस्कार सुरू केले आहेत.या पुरस्कारांचे वितरण येत्या २८ सप्टेंबरला संघाच्या सर्वसाधारण सभेत करण्यात येणार असल्याचे श्री.संसारे यांनी स्पष्ट केले.यावेळी उपाध्यक्ष प्रमोद रावराणे,संचालक तथा बँकेचे माजी संचालक दिगबंर पाटील,सचिव सिध्देश रावराणे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा