You are currently viewing शब्दांना मी काय दिले

शब्दांना मी काय दिले

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

शब्दांना मी काय दिले…

 

शब्दांना मी काय दिले हो नका विचारू मला

रोज रोज मी पहा बांधते या शब्दांचा झुला

झुला जातो गगनी माझा चंद्राला झोंबतो

ग्रहनक्षत्रे नि तारे सोबती रोज रोज आणतो…

 

रोजच करते शब्दांची मी बरोबरीने”तुला”

शब्द म्हणाले वापरण्याची तुझ्याजवळ ग कला

तुझ्यामुळे ग शाळेमध्ये घरोघरी पोहोचलो

घराघरातून गळ्यातले ग ताईत आम्ही बनलो…

 

आकाशवाणी रेडिओतून रोज रोज गुंजतो

सुमधुरती ती वाणी आम्ही सुद्धा रोज ऐकतो

गळ्यातले ग ताईत झालो तुझ्यामुळे “सु मती”

तुम्हा वाचूनी मिळत नाही पहा आम्हा सद् गती”…

 

तू प्रसवता आम्हाला ग मिळे पुन्हा जन्म

प्रसार होता जीवन होते पुन्हा पुन्हा धन्य

तुझ्या मागे धावता आमुची होते तारांबळ

तरीही मिळते असे वाटते दहा हत्तींचे बळ ..

 

पडून राहिलो एका जागी काय तयाला अर्थ

जीवन जाईल गंजून बघना जाईल सारे व्यर्थ

तुझ्या हाती ग होते सोने नक्षत्रे जणू चमकती

तुझी लेखणी चाले जेव्हा ओघळती तेव्हा “मोती”..

 

त्या मोत्यांची माला जेव्हा रसिकांना अर्पिते

आमुच्या सवेच जीवन त्यांचे धन्य धन्य होते

रसिक घेती डोक्यावर नि उदो उदो करती

शब्द तेव्हा मुखात त्यांच्या अमृत घट बनती…

 

अमृत द्रोण हे किती जीवने धन्य धन्य करती

जीवनावरी जडत जाते उत्तरोत्तर प्रीती

जगण्याला मग मिळे अर्थ तो सार्थ होती जीवने

हात जोडूनी शब्द म्हणाले धन्य केले ग जीणे…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

 

 

*संवाद मिडिया*

 

*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

तुम्हालाही 🏨 घरी बसून व्यवसाय 👩‍💼करायचा आहे का🤔 तेही अगदी कमी भांडवल 💵मध्ये…अहो मग वाट कसली पाहताय..🤗

 

*अंकिता आर्टिस्ट्री ब्युटी* मध्ये आजच आपली सीट🧾बुक करा 📝आणि ह्या 💁🏻‍♀️संधीचा लाभ घ्या🤩

 

*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*

 

♦️दिनांक – २०, २१ जानेवारी २०२४

 

*सावंतवाडी* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

 

*पत्ता* – हॉटेल सेलिब्रेशनच्या बाजूला, सावंतवाडी

 

♦️दिनांक – २२, २३ जानेवारी २०२४

 

*बांदा* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

 

*पत्ता* – कट्टा कॉर्नर जवळ, बांदा

 

👉 *क्लास फी २०००/- (२ दिवस)*

 

👉नथ बनविण्यासाठी लागणारे साहित्य दिले जातील

 

👉तुम्हाला एकूण ५ नथ शिकवले जातील (३ ब्रायडल, १ AD स्टोन, १ नावाची नथ)

 

👉 तुम्ही बनवलेल्या सगळ्या नथ घरी घेऊन जाऊ शकता

 

👉 नथ साठी लागणारे साहित्य हे कुठून घेता येईल ते मार्केट नॉलेज दिले जाईल

 

👉 फ्री💥 : कुडी, बुगडी कशी बनवावी हे दाखवले जाईल🥳

 

👉क्लास पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट दिले जाईल📜

 

👉 *Personal attention with hands on practice*

 

👉 *लवकर बूक करा थोडेच सीट उपलब्ध…*🤗

 

📱 *संपर्क : ९८३४६०९७४५ / ८७७९४८९९६२*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 4 =