You are currently viewing खेळत बसशील फुलांशी

खेळत बसशील फुलांशी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्मा. सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*खेळत बसशील फुलांशी*

 

सांभाळ गुच्छ नाजूक हाती

डसेल कदाचित बोटाला

गंधाळून तो हळूच सांगेल

संवाद *समस्त जनतेला*

1

हिरवा काटा दंश करता

बोट घालायचे तोंडात

रक्त आपले बाधत नाही

नियम आहे “अलिखित”

2

किती सतावते बट डोळ्याला

समीर करतो उपद्व्याप

धरू न शकतो हात तयाचा

फक्त पाहून होतोय संताप

3

व्हावे वाटते गुच्छ छोटासा

ऐकली असती तक्रार

भाग्य कुठे एवढे आमचे

राज्य करायला हृदयावर

4

वारा होऊन पुढील जन्मी

बसेन खेळत *बटांशी*

कळणार नाही तुला कधी

खेळत बसशील “फुलांशी”

5

नाही धाडली एकही चिठ्ठी

फक्त धाडला गुच्छ लाल

यातना ठेवून *मजपाशी*

जाणतोय सखे तुझे हाल

6

 

विनायक जोशी🖋️ ठाणे

9 3 2 4 3 2 4 1 5 7

प्रतिक्रिया व्यक्त करा