श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये कला वाणिज्य व विज्ञान विभागामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
सावंतवाडी
मुंबई विद्यापीठ संलग्न व सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी कला ,वाणिज्य व विज्ञान विभागामध्ये प्रवेश प्रक्रिया चालू आहे.
कला विभागामध्ये पदवीसाठी इंग्रजी, मराठी, हिंदी, अर्थशास्त्र, भूगोल, मानसशास्त्र तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये एम ए.इंग्रजी ,हिंदी, अर्थशास्र, भूगोल या विषयांसाठी प्रवेश प्रक्रिया चालू आहे.
कॉमर्स विभागामध्ये बी.कॉम, बी.कॉम (बँकिंग अँड इन्शुरन्स ) एम. कॉम( ऍडव्हान्स अकाउंटन्सी) या विषयांसाठी प्रवेश प्रक्रिया चालू आहे.
विज्ञान विभागामध्ये बीएसस्सी पदवीसाठी रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, गणित, वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र, कम्प्युटर सायन्स ,आयटी, डेटा सायन्स आणि ए आय या विषयांसाठी तसेच एम .एसस्सी साठी रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र या विषयांसाठी प्रवेश प्रक्रिया चालू आहे. वरील अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये येऊन त्वरित प्रवेश घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल.भारमल यांनी केले आहे.