You are currently viewing बांदा केंद्रशाळेत शाळा प्रवेशोत्सवाची गुढी बाईक रॅली,  पायाचे ठसे,झाडाचे‌ रोप देऊन नवागताचे स्वागत

बांदा केंद्रशाळेत शाळा प्रवेशोत्सवाची गुढी बाईक रॅली,  पायाचे ठसे,झाडाचे‌ रोप देऊन नवागताचे स्वागत

*बांदा केंद्रशाळेत शाळा प्रवेशोत्सवाची गुढी बाईक रॅली,  पायाचे ठसे,झाडाचे‌ रोप देऊन नवागताचे स्वागत

*बांदा*

प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर आज पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला बांदा सरपंच प्रियांका नाईक,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा संपदा सिध्दये, सदस्य हेमंत मोर्ये,संतोष बांदेकर, श्रद्धा नार्वेकर ,मुख्याध्यापक शांताराम असनकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सुरवातीला विद्यार्थ्यांनी कोल्हापूरी फेटे बांधून बांदा बाजारपेठेतून विद्यार्थ्यांची काढलेली बाईक रॅली लक्षवेधी ठरली.यावेळी विद्यार्थ्यांचे शाळेच्या गेटवर मिकीमाऊसने अभिवादन करून स्वागत केले‌. यावेळी विद्यार्थ्यांवर‌ पुष्पवृष्टी करून औक्षण केले‌ व झाडांचे रोप व गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव करण्यात आली‌ .या दिवशी शाळेच्या समोर शाळा प्रवेशोत्सवाची गुढी उभी करण्यात आली होती. शाळेत पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे उमटवून विद्यार्थ्यांच्या पालकांना दिले. यादिवशी शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश,बूट व मोजे यांचे वितरण करण्यात आले. या दिवशी दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा संपदा सिध्दये यांच्या सौजन्याने गोड जेवण देण्यात आले.शाळा प्रवेशोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी पदवीधर शिक्षक उदय सावळ ,जे.डी.पाटील, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस, शुभेच्छा सावंत, स्नेहा घाडी, जागृती धुरी, मनिषा मोरे‌,कृपा कांबळे, सुप्रिया धामापूरकर‌ यांनी परिश्रम घेतले यावेळी बांदा गावातील सर्व अंगणवाडी सेविका तसेच मान्डेलीझ कंपनीच्या सहकार्याने बाल रक्षा भारत या संस्थेच्या वतीने ईट राईट संस्थेचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

______________________________
*संवाद मीडिया*

👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

दहावी बारावी नंतर काय करायचे!!…

घडवा तुमचे करियर तुमच्या आवडत्या क्षेत्रात…

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*

आजच प्रवेश निश्चित करा.

(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-
१० व १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*

🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.

*संपर्क:*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,

*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 7972997567

कृपया पुढील Google form भरावा :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfwnE0gpLfPz2957rmmXllkrueZdpzXE5f0MKnJejNwJikRKg/viewform?usp=header

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/171794/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा