You are currently viewing होडावडा पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ले सावंतवाडी मार्गावरील वाहतूक ठप्प….

होडावडा पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ले सावंतवाडी मार्गावरील वाहतूक ठप्प….

होडावडा पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ले सावंतवाडी मार्गावरील वाहतूक ठप्प….

सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुर्लक्ष

वेंगुर्ले

वेंगुर्ले सावंतवाडी मार्गावरील होडावडा पुलावर आज पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. हे पुल कमी उंचीचे रस्त्यालगत असल्याने दरवर्षी या पुलावर पाणी येते आणि वाहन चालकांसह नागरिकांना त्याचा त्रास द्यावा लागतो. मात्र पुलाची उंची वाढविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असलेले नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

वेंगुर्ले सावंतवाडी मार्गावरील होडावडा गावातून वाहणारे नदीवर हे फुल आहे. होडावडा आणि तळवडे या दोन गावांमधील हे फुल रस्त्यालगत कमी उंचीचे आहे. दरवर्षी नदीला पूर आला की नदीचे पाणी पुलावरून वाहते आणि या मार्गावरील वाहतूक ठप्प होते. परिणामी नागरिकांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागते. किंवा आपली वाहने अन्य मार्गाने वळवावी लागतात. यात सर्वांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. दरवर्षी उद्भवणारी ही समस्या गंभीर असून याकडे संबंधित विभागाने अजूनही गांभीर्याने पाहिले नाही.

कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ही नदी दुथडी भरून वाहत आहे. परिणामी आज पहाटे पासून पुलावर पाणी आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा