You are currently viewing सिंधुदुर्ग दर्पण प्रबोधिनीतर्फे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजन

सिंधुदुर्ग दर्पण प्रबोधिनीतर्फे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजन

मुंबई :

 

दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग, छात्रशक्ती आणि तांडव थिएटर निर्मिती, श्रीमती कमल वसंत जाधव खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 10 डिसेंबर 2022 ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत होणार आहे. प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे 50 हजार, 30 हजार, तर उत्तेजनार्थ दोन संघांना 10 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. शिवाय रोख रकमेची वैयक्तिक पारितोषिकेही आहेत.

ही स्पर्धा पुणे येथे 10 डिसेंबर, अहमदनगर 11 डिसेंबर, कणकवली 18 डिसेंबर, नाशिक 25 डिसेंबर, तर मुंबई 8 जानेवारी 2023 रोजी स्पर्धा रंगणार आहे. अंतिम फेरी 14 जानेवारी 2023 रोजी अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे होणार आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे. अधिक माहितीसाठी राजेश कदम (9423832692), आनंद तांबे (9689144628), सुभाष कदम (9226301373) विशाल हडकर (9049813916), नरेंद्र तांबे (7588584793) याना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा