You are currently viewing वायरी येथे अज्ञातांकडून कारची तोडफोड…

वायरी येथे अज्ञातांकडून कारची तोडफोड…

वायरी येथे अज्ञातांकडून कारची तोडफोड…

मालवण
मालवण वायरी मोरेश्वर वाडी येथील विठ्ठल विश्वनाथ मालंडकर यांच्या मालकीच्या मारुती ओमनी कारची तोडफोड केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबत मालंडकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठल मलंडकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, आपल्या मालिकीची मारुती ओमनी कार (क्र. एमएच ०७ एच ११७३) ही नादुरुस्त असल्याने घरापासून काही अंतरावर पुलाजवळ एका बाजूला उभी करून ठेवण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने कारची समोरील काच तसेच हेडलाईट फोडून नुकसान केले आहे. या तक्रारीनुसार मालवण पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा