You are currently viewing मनसेच्या नूतन मालवण शाखेचे आज उदघाटन

मनसेच्या नूतन मालवण शाखेचे आज उदघाटन

मनसेच्या नूतन मालवण शाखेचे आज उदघाटन

मालवण

मालवण भरड येथील हॉटेल प्राईड नजीक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नूतन शाखेचे उदघाटन १४ मार्च रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षनिरीक्षक संदीप दळवी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार असल्याचे मनसे महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस यांनी जाहीर केल्याची माहिती मनसेचे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी दिली आहे.

या शाखा उदघाटन कार्यक्रमाला मनसेचे जिल्हा पक्ष निरीक्षक गजानन राणे, संदीप दळवी तसेच मनविसे राज्य प्रमुख संघटक यश देसाई, प्रमुख राज्य संघटक प्रशांत कनोजीया, जिल्हा अध्यक्ष धीरज परब, अनिल केसरकर, महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस, जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर, मनविसे जिल्हा अध्यक्ष केतन सावंत यांच्यासह मनसे मालवणचे माजी पदाधिकारी अमित इब्रामपूरकर, गुरु तोडणकर, विल्सन गिरकर, आबा आडकर, ज्येष्ठ व युवा मनसैनिक, मनविसे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मनसेच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन प्रसंगी मालवण मधील मनसेच्या माजी पदाधिकारी, महिला पदाधिकारी व मनसैनिक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मालवण मनसेच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा