You are currently viewing शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने “गॅस पे चर्चा”, चुलीवरची भाकरी चे अनोखे आंदोलन

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने “गॅस पे चर्चा”, चुलीवरची भाकरी चे अनोखे आंदोलन

२८ मार्च रोजी कणकवली पटवर्धन चौक येथे होणार आंदोलन

महिला वर्गाने सहभागी होण्याचे आवाहन

कणकवली

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात भरमसाट केलेल्या दर वाढीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्ग महिला आघाडीच्या वतीने कणकवली शहर पटवर्धन चौक येथे मंगळवार २८ मार्च २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता महिला आघाडीच्या वतीने लक्षवेधी “गॅस पे चर्चा” आणि “चुलीवरची भाकरी” आंदोलन करण्यात येणार आहे. गॅस सिलेंडर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे सर्व सामान्य नागरिक, गृहिणी यांचे बजेट कोलमडले असून त्यांच्या जीवनमानावर परिणाम होत आहे. गृहिणींचे मनस्वास्थ्य बिघडत आहे. ही वाढत जाणारी दरवाढ कमी व्हावी त्याचबरोबर गरिबांचे रेशन धान्य हिरावले जाणार आहे त्याविरोधात देखील धरणे आंदोलनातून निदर्शने करून निषेध केला जाणार आहे. याबाबतचे निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कणकवली तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख नीलम सावंत, वैदेही गुडेकर, संजना कोलते, माधवी दळवी, दिव्या साळगावकर, संजना साटम आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा