You are currently viewing राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली भेट

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली भेट

 

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या 24 जुलै रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांची राष्ट्रपती भवनात जाऊन सदिच्छा भेट घेतली. विशेष म्हणजे चालू महिन्याच्या सुरुवातीला उभयतांनी राष्ट्रपतीच्या कानपूर जिल्ह्यातील गावाला एकत्रितपणे भेट दिली होती. राष्ट्रपती निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या 15 तारखेला अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार या निवडणुकीसाठी 29 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. या पदासाठी 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलैला निकाल जाहीर केला जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 10 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिल्याने काँग्रेस, भाजप सहीत इतर पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची चाचपणी सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =