You are currently viewing माडखोल धरणाची पाईपलाईन बदलल्यास वारंवार दुरुस्तीसाठी शासनाचा पैसा वाचेल : संजय लाड

माडखोल धरणाची पाईपलाईन बदलल्यास वारंवार दुरुस्तीसाठी शासनाचा पैसा वाचेल : संजय लाड

सावंतवाडी

माडखोल धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याची पाईपलाईन जीर्ण झाली आहे. त्यामुळे वारंवार दुरुस्ती नकरता नवीन पाईप लाईन झाल्यास कमीत कमी पाच वर्षे शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळेल.

तसेच वारंवार दुरुस्तीसाठी होणार लाखो रुपये शासनाचा पैसाही वाचू शकतो,असा दावा माजी सरपंच संजय लाड यांनी केला आहे.
दरम्यान या पाईपलाईनसाठी अंदाजपत्रक तयार करून तात्काळ शासकीय मंजुरीसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.तसे निवेदन संजय लाड यांनी सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 1 =