You are currently viewing कणकवलीत पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

कणकवलीत पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

सिलिंडरने घेतला अचानक पेट; ओले गोणपाट टाकून आग आटोक्यात

कणकवली

नेहमीच वर्दळ असलेल्या कणकवली येथील आप्पासाहेब पर्टवर्धन चौकातील हॉटेल काकडे मध्ये अचानक सिलिंडरने पेट घेतला. या प्रकारानंतर याठिकाणी एकच खळबळ उडाली. त्यानंतर प्रसंगावधान राखत पो. कैलास इंपाळ, वाहतूक पोलीस प्रकाश गवस व संदेश अबिटकर यांनी पेट घेतलेल्या सिलिंडर रस्त्यावर आणून त्यावर ओले केलेले गोणपाट टाकून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अर्नथ टळला. हा प्रकार दुपारी 1.30 वा. सुमारास घडला.

कणकवली येथील नेहमीच गजबजलेल्या असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन चौकात हॉटेल काकडेमध्ये कामगार खाद्यपदार्थ तयार करीत होते. त्यावेळी गॅस सिलिंडरच्या रेग्यूलेटर गरम झाल्याने तो पेटून अगीचा भडका उडला. या प्रकारनंतर चौकात एकच खळबळ उडाली. त्यानंतर वाहतूक पोलीस प्रकाश गवस व श्री. अबिटकर, कैलास इंपाळ, यांनी प्रसंगावधान राखत तेथील कामगारांना बाजूला करून गोणपाट ओले करून पेट घेतलेल्या सिलिंडरवर टाकून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अर्नथ टळला. पो. कैलास इंपाळ, श्री. गवस व श्री. अबिटकर यांनी दाखवलेल्या या तत्परेबद्दल त्यांचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा