You are currently viewing ओटवणेत रांगोळी स्पर्धेत छाया आनंद मेस्त्रीचा प्रथम क्रमांक

ओटवणेत रांगोळी स्पर्धेत छाया आनंद मेस्त्रीचा प्रथम क्रमांक

ओटवणे  :

ओटवणे येथील गावठणवाडी कला क्रीडा व मित्रमंडळाच्या १० व्या ‘दीपावली शो टाइम निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत छाया आनंद मेस्त्री हिने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत रसिका नारायण मेस्त्री द्वितीय, सानिका विश्वनाथ भिसे तृतीय तर उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी रत्नप्रभा सूर्यकांत मेस्त्री, साक्षी संजय कविटकर, नयना शरद मेस्त्री यांची निवड करण्यात आली.

या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी तिलारी पाटबंधारे खात्याचे उपअभियंता संतोष कविटकर, वेंगुर्ले पंचायत समितीच्या कृषी अधिकारी सौ शुभदा कविटकर, सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बाबाजी गावकर, माजी सरपंच रविंद्र म्हापसेकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सगुण गावकर, मुंबई मंडळाचे संपर्कप्रमुख दशरथ गावकर, ग्रामपंचायत सदस्या समिक्षा गावकर, मनाली गावकर, अस्मिता भगत, युवा सामाजिक कार्यकर्ते बबलू गावकर, नामदेव गावकर, एकनाथ गावकर, पोलीस पाटील शेखर गावकर, ज्येष्ठ दशावतारी कलाकार विठ्ठल गावकर, सुनिल मेस्त्री, कवी कृष्णा देवळी, प्रमोद गावकर, संजय कविटकर, बाळकृष्ण भगत, मंगेश चिले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संतोष कविटकर यांनी मंडळाच्या उपक्रमांना तसेच गावाच्या विकास कामांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. बबलू गावकर यांनी मंडळाची एकजूट कायम राखण्याचे आवाहन करीत आपण मंडळाच्या पाठीशी असल्याचे सांगितले. संतोष कासकर यांनी मंडळाच्या विविध क्षेत्रातील उपक्रमांचे कौतुक केले. दाजी गावकर यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या एकोप्याचे कौतुक केले. रविंद्र म्हापसेकर यांनी या मंडळाचे कार्य गावातील इतर मंडळासाठी आदर्श असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमात कृष्णा देवळी आणि सौ शुभदा कविटकर यांचा शाल व श्रीफळ देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण मूर्तिकार सुरेश वरेकर, जे आर्ट कॉलेजचा विद्यार्थी संकेत कांबळी, शिक्षक मिलिंद गावकर, सौ राधा मिलिंद गावकर यांनी केले. स्पर्धेची पारितोषिके ओटवणे शाळा नंबर १ चे मुख्याध्यापक अरुण होडावडेकर यांनी पुरस्कृत केली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मंडळाचे सचिव महेश चव्हाण यांनी तर आभार मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा