परफेक्ट अकॅडेमीच्या’ माध्यमातून सर्वोत्तम करिअर घडवा – वासुदेव नाईक
सावंतवाडी :
आम्ही विद्यार्थी दशेत असताना आम्हाला जास्त मार्गदर्शनाची सोय उपलब्ध नव्हती. मात्र आज काळाची गरज ओळखून प्रा. राजाराम परब यांनी सावंतवाडी आणि कुडाळ या दोन ठिकाणी दहावीनंतर व बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी नीट, जेईई, एमएच सीईटी व तत्सम महत्त्वपूर्ण परीक्षांच्या मार्गदर्शनाचे दालन उभे करून कोकणातील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला न्याय देण्याछवे प्रामाणिक काम केले आहे. विद्यार्थी व पालकांनी परफेक्ट अकॅडेमीच्या मार्गदर्शनाने आपले करिअर घडवावे, असे आवाहन सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी केले. सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात ‘परफेक्ट अकॅडेमी’च्या वतीने आयोजित ‘परफेक्ट गौरव सोहळा – २०२५’ आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून श्री. नाईक बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर, सुप्रसिद्ध निवेदक व व्याख्याते प्रा. रुपेश पाटील, पुणे येथील यशस्वी महिला इंजिनियर ममता परब, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, माजी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, परफेक्ट अकॅडेमीचे संचालक प्रा. राजाराम परब आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना परफेक्ट अकॅडेमीच्या वतीने दहावीत मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल सन्मानाचिन्ह, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत प्रा. राजाराम परब यांनी केले. आपल्या प्रास्ताविकेतून प्रा. परब यांनी सांगितले की, कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक बुद्धिमत्ता असून त्यांच्यात कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्याची धमक आहे. मात्र केवळ मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी अपेक्षित करिअर घडवू शकत नाहीत. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून मागील काही वर्षात सर्वोत्तम करिअर करण्यासाठी परफेक्ट अकॅडेमीने मेहनत घेतली आहे. म्हणून आज अनेक क्षेत्रात परफेक्ट अकॅडेमीचे विद्यार्थी भरारी घेत आहेत. हे त्याचे फलित आहे. असे सांगत त्यांनी अकॅडेमीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी माफक दरात शिक्षणाचे व्यवस्था तसेच स्कॉलरशिपच्या माध्यमातून होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना उत्तम करिअर करण्याची व्यवस्था केली असल्याचे नमूद केले.
यावेळी मुख्य अतिथी सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक म्हणाले, आजच्या काळात विद्यार्थी व पालकांनी करिअरच्या दृष्टीने खूप सजग असणे गरजेचे आहे. प्रा. राजाराम परब यांच्या परफेक्ट अकॅडेमीच्या माध्यमातून उत्तम करिअर घडवून यशस्वी होणे अत्यंत गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर म्हणाले आजच्या काळात पालकांनी आपल्या पाल्यांकडे योग्य ते लक्ष देणे गरजेचे आहे. कारण हल्ली समाजात अतिशय विघातक परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र वारंवार नजरेसमोर पडत आहे. त्यामुळे आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे. प्राध्यापक राजाराम परब सरांनी परफेक्ट अकॅडेमीच्या माध्यमातून आपल्या कोकणातील मुलांना दर्जेदार शिक्षणाची सोय करून एक प्रकारे आपल्यावर उपकारच केले आहेत. आपण त्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन श्री. पार्सेकर यांनी केले.
यावेळी प्रा. रुपेश पाटील म्हणाले, आपल्या कोकणातील मुलांमध्ये शालेय स्तरावरील असलेली गुणवत्ता उच्च शिक्षणात किंवा स्पर्धा परीक्षा का दिसत नाही?, हा संशोधनाचा विषय असून आपण प्रत्येकाने स्वतःला तपासले पाहिजे. तसेच परफेक्ट अकॅडेमीच्या विविध स्कॉलरशिपचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःचे भवितव्य उज्वल करावे, असेही प्रा. पाटील म्हणाले.
पुणे येथील यशस्वी महिला इंजिनियर ममता परब म्हणाल्या, आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषासमान काम करीत आहेत. असे असतानाही समाजाकडून महिलांचा योग्य तो सन्मान होत नाही. आजच्या काळात प्रत्येक मुलीने आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. मी आज यशस्वी होऊ शकले कारण माझ्या पाठीमागे माझे ज्येष्ठ बंधू प्रा. राजाराम परब यांचा अभ्यासपूर्ण पाठिंबा होता. आता हाच पाठिंबा तुम्हाला परफेक्ट अकॅडेमीच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिला असून त्याचा सर्वांनी लाभ घेणे गरजेचे असल्याचे ममता परब यांनी सांगितले.यावेळी उपस्थित असलेले सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर व माजी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनीही कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परफेक्ट अकॅडेमीच्या सावंतवाडी शाखेचे समन्वयक अमोल खरात यांनी केले. यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुडाळ शाखेच्या समन्वयक शितल कांबळी, कणकवली समन्वयक पूर्वी जाधव, फातिमा मकानदार, सोनाली जाधव यांसह परफेक्ट अकॅडेमीच्या टीमने प्रयत्न केले. शेवटी उपस्थितांचे आभार शितल कांबळी यांनी व्यक्त केले.